Thursday, October 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका! ३ जागांवर विजय, महायुतीला २ जागा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 29, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला किती जागा मिळणार? पहा
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून, या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, महायुतीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निकालांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, महाविकास आघाडीसाठी हे निकाल उत्साहवर्धक मानले जात आहेत.

राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. या निकालामुळे नागपूरमधील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. या लढतीत शरद पवार यांच्या पक्षाने विजय मिळवल्याने महाविकास आघाडीला महत्त्वाचे यश मिळाले.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला यश

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवत महायुतीच्या खात्यात एक जागा जमा केली. या विजयामुळे भाजपला दिलासा मिळाला असून, शिक्षक मतदारसंघातील ही लढत महायुतीसाठी महत्त्वाची ठरली.

अमरावतीत किरण सरनाईक पुन्हा विजयी

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे किरण सरनाईक यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे महायुतीला आणखी एका जागेवर यश मिळाले.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला धक्का

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख यांनी विजय मिळवला. या निकालामुळे महाविकास आघाडीच्या विजयात आणखी एका जागेची भर पडली.

निकालामुळे महाविकास आघाडीला बळ

पाच जागांच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघांतील विजयासह मराठवाड्यात मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांतील विजयामुळे महायुतीनेही आपले अस्तित्व कायम ठेवले.

एकंदरीत, विधानपरिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने सरशी साधली असून, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या निकालांचे महत्त्व वाढले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

५० हजारांची मागणी, २० हजार स्वीकारले; रावेरमध्ये वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

Next Post

विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वाद ; भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वाद ; भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले

विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वाद ; भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आणखी एक योजना बंद होणार; कारण काय?

October 29, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

रेल्वेत स्टेशन मास्टर होण्याची सुवर्णसंधी! १,२६५ पदांसाठी भरती; असा करा ऑनलाइन अर्ज

October 29, 2026
विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वाद ; भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले

विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वाद ; भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले

October 29, 2026
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला किती जागा मिळणार? पहा

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका! ३ जागांवर विजय, महायुतीला २ जागा

October 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page