Wednesday, October 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

‘अर्णब’ चक्रीवादळाचा कहर! ९० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2026
in राष्ट्रीय
0
‘अर्णब’ चक्रीवादळाचा कहर! ९० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
बातमी शेअर करा..!

बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अर्णब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून, त्याची तीव्रता वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. २८ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशातील यानमजवळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १३५ किलोमीटरपर्यंत, तर वाऱ्याचे झोत ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या असून, रेल्वेनेही ९० हून अधिक गाड्या रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर वादळाचा धोका

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘अर्णब’ चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. हे वादळ आंध्र प्रदेशातील यानमजवळ, यानमच्या दक्षिणेकडे किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर धडकताना वादळाची तीव्रता कायम राहिल्यास जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो.

विशाखापट्टणम हवामान विभागाचे संचालक पी.एल.एन. मूर्ती यांच्या माहितीनुसार, चक्रीवादळ ताशी १८ किलोमीटर वेगाने पुढे सरकत होते. ते काकीनाडापासून सुमारे ७० किलोमीटर, विशाखापट्टणमच्या आग्नेयेला १७० किलोमीटर आणि बापटलापासून २४० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. किनारपट्टीवरील परिस्थितीवर हवामान विभाग आणि प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

नऊ राज्यांना सतर्कतेचा इशारा; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशासह नऊ राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. दिल्ली-एनसीआरसह काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. वादळामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या असून, रेल्वेने ९० हून अधिक गाड्या रद्द केल्याचे वृत्त आहे. आंध्र प्रदेश, झारखंड आणि ओडिशातील काही भागांत शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन किनारपट्टीवरील संवेदनशील भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली आहे. ओडिशातील गंजम जिल्ह्यातील नागरिकांना चक्रीवादळ निवारण केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. गोपालपूर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचे वृत्त आहे.

चक्रीवादळाचा महाराष्ट्र्रावरही परिणाम

‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ! बोगस मान्यता रद्द करण्याचे आदेश धडकले

Next Post

चोपड्यात कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; एकाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका

चोपड्यात कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; एकाला अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच १,५०० रुपये; सरकारकडून ३४४ कोटींच्या निधीला मंजुरी

October 28, 2026
जळगावात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना शॉक लागून वायरमनचा मृत्यू

जळगावात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना शॉक लागून वायरमनचा मृत्यू

October 28, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

८५ वर्षांचे शरद पवार मैदानात; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय, आता थेट..

October 28, 2026
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका

चोपड्यात कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; एकाला अटक

October 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page