नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर भव्य आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. एसआयआर प्रक्रियेसह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आवाज उठवण्याची तयारी विरोधकांनी केली असून, या आंदोलनापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे.
‘मी भाजपचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी आमची विचारसरणी देशाच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरांत पोहोचवण्याचे काम अगदी मोफत केले,’ असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. भाजपकडून होणाऱ्या टीकेमुळे आणि विरोधामुळे आपली विचारसरणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा त्यांनी केला.
विरोध कराल, तितके लोक आमच्याशी जोडले जातील!
इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. सत्ताधाऱ्यांकडून कितीही टीका झाली किंवा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तरी जनतेचे प्रश्न मांडणे थांबवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या विचारसरणीला जितका विरोध केला जाईल, तितके अधिक लोक आमच्याशी जोडले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा देण्यावरही पक्षाने भर दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हमारा वोट चुराया जा रहा है और ये हम किसी हाल में चुपचाप नहीं सहेंगे।
मतदाता सूचियों से नाम काटे गए। नियम-कानून तोड़े गए। और सवाल पूछने वालों पर लाठियां चलीं।
अब जवाब देश देगा।
1 नवंबर – चलो दिल्ली।
वोट बचाओ – देश बचाओ जन मार्च और महारैली।छात्र, किसान, मज़दूर, महिलाएं, नौजवान और व्यापारी – जिस-जिस को लोकतंत्र की फ़िक्र है, वो ज़रूर आए।
वोट आपका है। लड़ाई भी आपकी है।
📍 रामलीला मैदान, नई दिल्ली
PS: BJP और उसके साथियों का दिल से धन्यवाद, जो इस कार्यक्रम का इतना ज़ोर-शोर से प्रचार कर रहे हैं और इसे ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचा रहे हैं।
बस अगले 7 दिन भी यही जोश और लगन बनाए रखिए!
#ChaloDilli
#RamlilaMarch— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2026
महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर
इंडिया आघाडीच्या बैठकीत केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची रणनीती आखण्याबरोबरच महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित गैरवापरासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लोकशाही आणि संविधानासमोरील आव्हानांचा मुद्दाही उपस्थित केला.
आगामी काळात सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे सरकारच्या धोरणांना विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनातून इंडिया आघाडी किती प्रभावी शक्तिप्रदर्शन करते आणि त्याचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post