Wednesday, October 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींच्या आरोपाचे पुरावे उद्या देणार; मनोज जरांगे पाटलांच्या घोषणेने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 21, 2026
in महाराष्ट्र
0
एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींच्या आरोपाचे पुरावे उद्या देणार; मनोज जरांगे पाटलांच्या घोषणेने खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नारायण गडावरील दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केला होता. आता या आरोपासंदर्भातील पुरावे उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने आणखी भक्कम आणि मोठे होण्याचे आवाहन केले. याच भाषणादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणावर त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी उद्या सकाळी ११ वाजता पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले.

‘माझा समाज लेचापेचा नाही’

आपल्या भूमिकेबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. समाजासाठी आपण लढत असून, कोणत्याही परिस्थितीत आपण मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या हिताच्या मुद्द्यावर कोणी पुढे येऊन बोलले, तर त्याला उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी काही राजकीय नेत्यांचा उल्लेख करत त्यांच्याबद्दल आपण थेट काही बोलणार नसल्याचे सांगितले. मात्र, आरोपांबाबत पुरावे मागितले जात असतील, तर ते पत्रकार परिषदेत देणार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

रामदास कदम यांचे जरांगेंना आवाहन

दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रतिक्रिया देताना मराठा समाजातील व्यक्तींनी अफवा किंवा कुजबुजीकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन केले. ज्याच्यात हिंमत असेल, त्याने समोर येऊन बोलावे आणि त्यानंतर त्याला उत्तर द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते नेमके कोणते पुरावे सादर करतात आणि या आरोपांवर एकनाथ शिंदे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

प्रवाशांना मोठा दिलासा! जळगाव-पानिपत दरम्यान विशेष रेल्वे धावणार

Next Post

सरकारी नोकरीची मोठी संधी! ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडियन ऑइलमध्ये ३३५ जागांसाठी भरती; ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांना मोठी संधी

सरकारी नोकरीची मोठी संधी! ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इंडियन ऑइलमध्ये ३३५ जागांसाठी भरती; ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांना मोठी संधी

सरकारी नोकरीची मोठी संधी! ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

October 21, 2026
एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींच्या आरोपाचे पुरावे उद्या देणार; मनोज जरांगे पाटलांच्या घोषणेने खळबळ

एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींच्या आरोपाचे पुरावे उद्या देणार; मनोज जरांगे पाटलांच्या घोषणेने खळबळ

October 21, 2026
प्रवाशांना मोठा दिलासा! जळगाव-पानिपत दरम्यान विशेष रेल्वे धावणार

प्रवाशांना मोठा दिलासा! जळगाव-पानिपत दरम्यान विशेष रेल्वे धावणार

October 21, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? गुलाबराव पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!

October 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page