Monday, October 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर अभिजीत दीपकेंची पोलिसांवर नाराजी; काय म्हणाले?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 19, 2026
in महाराष्ट्र
0
टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर अभिजीत दीपकेंची पोलिसांवर नाराजी; काय म्हणाले?
बातमी शेअर करा..!

मुंबई । बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी खऱ्या आरोपींकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित व्यक्तींनी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला असून, मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अभिजीत दीपके म्हणाले, “विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी खऱ्या आरोपींवर लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा सरकार आणि पोलीस चुकीच्या गोष्टींना प्राथमिकता देतात, तेव्हा असंच घडतं.” टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान, मागील आठवड्यात दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना अटक केली होती. त्यांच्यासोबत आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या अभिजीत दीपके जामिनावर बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार

मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी चार ते पाच राऊंड फायरिंग केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला; मात्र त्याच्या ड्रायव्हरसह दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, सलमान खानसोबत काम करणाऱ्या आणि आपल्या धमक्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील व्यक्तींना लक्ष्य करण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

तपासासाठी मुंबई पोलिसांची १५ पथके

गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी १५ पथके तयार करण्यात आल्याची माहिती आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकीचा शोध घेतला जात आहे. संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून, फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रात्री उशिरा टायगर श्रॉफशी संवाद साधून त्याला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

Next Post

जळगावजवळ भीषण अपघात! झुरखेडेच्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावजवळ भीषण अपघात! झुरखेडेच्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू

जळगावजवळ भीषण अपघात! झुरखेडेच्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

सरकारी नोकरीची मोठी संधी! CWC मध्ये ३२७ पदांची भरती; पगार १.४० लाखांपर्यंत

October 19, 2026
टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणात तीन शूटर पोलिसांच्या जाळ्यात

टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणात तीन शूटर पोलिसांच्या जाळ्यात

October 19, 2026
महाराष्ट्रावर जलसंकटाचे सावट! धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? आकडेवारी पाहून चिंता वाढणार!

महाराष्ट्रावर जलसंकटाचे सावट! धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? आकडेवारी पाहून चिंता वाढणार!

October 19, 2026
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकेत! या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; जळगावात…

October 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page