जळगाव । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून, मृतांमध्ये तीन बालकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
या अपघातातील मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने परिसरात शोककळा पसरली असून, या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रक आणि दुचाकीची धडक कशी झाली, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मृतांची अधिकृत ओळख तसेच अपघाताच्या कारणांबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.















Discussion about this post