नवी दिल्ली । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीत आंदोलनाची हाक दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अनेक कार्यकर्त्यांना दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले, तर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही विमानातून ताब्यात घेण्यात आले. मात्र, रविवारी तिघांची जामिनावर सुटका झाल्यानंतर अभिजीत दीपके यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजीच्या निधनामुळे ते आपल्या गावी हिंगोलीला रवाना झाले आहेत.

जामिनावर सुटका; एक वर्ष शांतता भंग न करण्याची अट

दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जवळपास २४ तासांनंतर रविवारी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर तिघांनाही अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला. हमीपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली असून, एका वर्षाच्या कालावधीत शांतता भंग न करण्याची अट घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिघेही बाहेर आले. मात्र, माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.
आजीच्या निधनाने दीपके कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सीजेपीच्या आंदोलनाच्या दिवशीच अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी अभिजीत हिंगोलीला जाणार असल्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असल्याने आणि त्यानंतरच्या प्रक्रियेमुळे त्यांना वेळेत पोहोचता आले नाही.
आता सुटका झाल्यानंतर अभिजीत दीपके हिंगोलीतील आपल्या गावी रवाना झाले आहेत. या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून स्पष्ट केले आहे.
सौरव दास आणि आशुतोष रांका घेणार पत्रकार परिषद
अभिजीत दीपके गावी रवाना झाले असले तरी सीजेपीच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईसंदर्भात सौरव दास आणि आशुतोष रांका पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती अभिजीत यांनी दिली आहे.
‘सीजेपी माघार घेणार नाही आणि कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना घाबरणार नाही,’ असा ठाम संदेशही त्यांनी दिला आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत कोणते आरोप केले जातात आणि आंदोलनाची पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘१० ऑक्टोबरचा दिवस इतिहासात नोंदवला जाईल’
अभिजीत दीपके यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये १० ऑक्टोबरच्या घटनेवर भाष्य करत हा दिवस हुकूमशाहीच्या अंताची सुरुवात म्हणून इतिहासात नोंदवला जाईल, असे म्हटले आहे.
दरम्यान, अभिजीत दीपके गावी रवाना झाल्यानंतर सीजेपीच्या आंदोलनाची जबाबदारी सौरव दास आणि आशुतोष रांका कशा प्रकारे पुढे नेतात, तसेच दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर ते पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्या














Discussion about this post