दिल्ली । दिल्लीतून सीजेपीच्या आंदोलनासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीनंतर तिघांनाही ५० हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सीजेपीच्या तिन्ही नेत्यांना दिल्ली कँट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले होते. यावेळी तिघांना ताब्यात ठेवण्यात येणार की त्यांची सुटका होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सुनावणीनंतर प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, तिन्ही नेत्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आता सीजेपीच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार का? तसेच अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास पुन्हा आंदोलनात सहभागी होणार का, याकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post