बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील (RRBs) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत तब्बल १३ हजार ४४१ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना IBPS च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
या भरतीमध्ये कार्यालय सहाय्यक, अधिकारी स्केल-I, अधिकारी स्केल-II आणि अधिकारी स्केल-III अशा विविध पदांचा समावेश आहे.
रिक्त पदांचा तपशील :
कार्यालय सहाय्यक – ७,९९३
अधिकारी स्केल-I – ४,२५६
अधिकारी स्केल-II (जनरल बँकिंग) – ६६६
अधिकारी स्केल-II (IT) – ७९
अधिकारी स्केल-II (CA) – ९९
अधिकारी स्केल-II (कायदा)- ४८
अधिकारी स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – १८
अधिकारी स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – १६
अधिकारी स्केल-II (कृषी अधिकारी) – ४८
अधिकारी स्केल-III – २२०
कोण करू शकते अर्ज?
या भरतीतील विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. संबंधित पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, चार्टर्ड अकाउंटन्सी, एमबीए, कायदा, कृषी, उद्यानशास्त्र, दुग्धव्यवसाय, पशुपालन, पशुवैद्यकशास्त्र किंवा अभियांत्रिकी यांसारख्या शाखांमधील पदवी आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
कार्यालय सहाय्यक पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे, अधिकारी स्केल-I साठी १८ ते ३० वर्षे, अधिकारी स्केल-II साठी २१ ते ३२ वर्षे, तर अधिकारी स्केल-III साठी २१ ते ४० वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

अर्ज शुल्क किती असेल?
अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना ₹175 भरावे लागतील. इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹850 आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान हे शुल्क ऑनलाइन भरता येईल.
असा करा ऑनलाइन अर्ज
उमेदवारांनी सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर संबंधित RRB भरतीच्या अर्ज लिंकवर क्लिक करून ‘Click here for New Registration’ या पर्यायातून नवीन नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी. त्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज शुल्क भरावे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घेऊन सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. अर्जाची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२६ आहे.
अर्जाची अंतिम तारीख : २१ सप्टेंबर २०२६
त्यामुळे बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या पात्र पदवीधर उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post