Thursday, August 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यावरून काय म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 27, 2026
in महाराष्ट्र
0
परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यावरून काय म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्याची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या कालावधीत मराठी न आल्याच्या कारणावरून संबंधित चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी बोलता न आल्यास रिक्षा चालकांचा बॅज रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या निर्णयाला परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. काही संघटनांनी संप पुकारल्यानंतर मुंबईत रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रकारही समोर आले होते.

यानंतर रिक्षा चालकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

रिक्षा चालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यात राहून काम करताना जुजबी मराठी भाषा अवगत असणे आवश्यक असल्याचे मान्य केले. मराठी शिकण्यासाठी आपण प्रयत्न करत असून, विविध क्लासेस आणि मराठी साहित्याच्या माध्यमातून भाषा शिकण्याची तयारी असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी देण्याचा निर्णय जाहीर केला.

वर्षभर कारवाई नाही

मुख्यमंत्री म्हणाले की, रिक्षा चालक स्वतःहून पुढे येऊन मराठी शिकण्याची तयारी दाखवत असतील, तर त्यांना त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना एक वर्षाची मुदत देण्यात येत आहे. या काळात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर तात्पुरता तोडगा निघण्याची शक्यता आहे. आता रिक्षा चालक संघटना आणि चालक या एक वर्षाच्या मुदतीत मराठी भाषा शिकण्याच्या दिशेने काय पावले उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती

Next Post

तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

जेलच्या बाहेर ‘भाई’च्या बर्थडेचा जल्लोष भोवला; पोलिसांनी दोघांची काढली धिंड!

जेलच्या बाहेर ‘भाई’च्या बर्थडेचा जल्लोष भोवला; पोलिसांनी दोघांची काढली धिंड!

August 27, 2026
तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

August 27, 2026
परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यावरून काय म्हणाले..

परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यावरून काय म्हणाले..

August 27, 2026
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती

August 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page