Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 24, 2026
in महाराष्ट्र
0
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?
बातमी शेअर करा..!

मुंबई । अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाईला वेग आला आहे. विविध ठिकाणी छापे टाकून अन्नपदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. या कारवाईदरम्यान राज्यातील दूध व्यवसायाबाबत धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या बाजारपेठेत दररोज तब्बल २० लाख लिटर दूध भेसळीमुळे बाजारातून गायब होत असल्याचे सांगितले जात आहे. या दुधाची अंदाजे रोजची किंमत ८ कोटी रुपये, तर महिन्याला तब्बल २४० कोटी रुपये असल्याचा दावा आहे.

एफडीएच्या कारवाईत काही ठिकाणी दूध भेसळयुक्त आणि मानवी आरोग्यासाठी घातक घटकांचा वापर करून तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृत्रिम दूध कसे तयार केले जाते, त्यात कोणत्या प्रकारची भेसळ केली जाते आणि अशा पदार्थांचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

कृत्रिम दुधात कशाची भेसळ केली जाते?

जे दूध नैसर्गिक असते त्या दुधात पाणी, फॅट, प्रोटीन्स (केसीन), लॅक्टोज (साखर) व खनिजे असतात. कृत्रिम दुधात या घटकांची रसायने वापरली जातात. पाणी कृत्रिम दुधाचा मुख्य भाग आहे, त्यात आधी दुधाचा विरहित घनपदार्थ व नायट्रोजन मिसळले जाते. हे दोन्ही नैसर्गिक दुधासारखी दिसण्यासाठी युरिया किंवा अमोनियम सल्फेट यात मिसळले जाते.

या दुधातील फॅटसाठी यात अतिशय हलक्या दर्जाचे रिफाइंड तेल, व्हेजिटेबल ऑइल किंवा डालडा अथवा पामतेल मिसळले जाते. पाणी व तेल एकत्र मिसळू न शकल्याने त्यात डिटर्जंट पावडरही टाकली जाते. डिटर्जंटमुळे तेल व पाणी एकमेकांत मिसळल्याने दुधासारखे दाट व पांढरे फेसाळ दिसते, नैसर्गिक दुधाप्रमाणे पांढरा रंग, दाटपणा आणण्यासाठी त्यात स्टार्च, मैदा, लिक्विड पॅराफिन किंवा ब्लॉटिंग पेपरचे पाणी मिसळतात. दुधाला नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी त्यात हलकीशी ग्लुकोज पावडरही मिसळली जाते.

नैसर्गिक दूध आणि कृत्रिम दूध ओळखायचे कसे ?

लाकूड, काच किंवा फरशीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. तो पृष्ठभाग थोडासा तिरपा करा. नैसर्गिक दूध हळूहळू खाली सरकते आणि पांढरी रेषा/डाग मागे सोडते. भेसळयुक्त दूध पटकन खाली वाहून जाते आणि डाग सोडत नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

Next Post

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page