बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर, जनरल बँकिंग ऑफिसर आणि डोमेन एक्सपर्ट्सच्या एकूण ३९५ पदांसाठी भरती जाहीर केलीय. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक व पात्र उमेदवारांना युनियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ जाऊन अर्ज करावा लागणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकर अर्ज करावी
या भरती अंतर्गत एकूण जागा ३९५ पदे भरली जाणार आहेत, ज्यात मॅनेजर: १६३ जागा, सिनियर मॅनेजर: १५३ जागा, चीफ मॅनेजर: ५२ जागा, असिस्टंट जनरल मॅनेजर: २० जागा आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदाच्या ०७ जागांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रियेला २१ जुलैपासून सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवार येत्या १० ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी युनियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
संबंधित पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation), B.E./B.Tech, MCA, MBA (Finance), CA, Law (LLB) किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी/पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. सोबतच पदांनुसार कामाचा अनुभव मागण्यात आला आहे. अर्जदारांचे वय पदाच्या स्केलनुसार २२ ते ५० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. (शासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट लागू राहील.) उमेदवारांची निवड त्यांच्या अर्जांचे स्क्रीनिंग, ऑनलाईन परीक्षा (Online Exam), ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत या टप्प्यांच्या आधारे केली जाईल.
अर्ज शुल्क किती आहे?
उनाधारित/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय: ₹१,१८०, जीएसटीसह
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/दिव्यांग: ₹१७७, जीएसटीसह
अर्ज कसा करावा?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत भरती पोर्टलला भेट द्यावी. त्यानंतर, खालील पायऱ्या पूर्ण करा:
जर तुम्ही नवीन उमेदवार असाल, तर “नवीन नोंदणी” (New Registration) वर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
आवश्यक असलेली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा.
तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क भरा.
अर्ज सादर करा.
अर्ज स्वीकृती पृष्ठाची (application confirmation page) प्रत भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा.















Discussion about this post