Friday, July 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावसह राज्यात पावसाचा कहर; जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट, हतनूरचे ३६ दरवाजे उघडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 31, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज
बातमी शेअर करा..!

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने कहर केला असून हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यवतमाळला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती, नाशिक, धुळे, वाशिम, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जामनेर तालुक्यातील वाकी नदी २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. अनेक दिवसांपासून कोरडे असलेले नदीपात्र आता पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहे.

दरम्यान, हतनूर धरणाचे तब्बल ३६ दरवाजे उघडण्यात आले असून ७८ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण परिसरातील तसेच तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मनुदेवी धबधबा प्रवाहित; सातपुड्यात मुसळधार पाऊस

सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मनुदेवी धबधबा प्रवाहित झाला आहे. मुक्ताईनगर परिसरातील कुंड धरण भरले असून कुर्‍हा-काकोडा येथील नदीलाही पूर आला आहे. मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि यावल तालुक्यांतील अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पूरग्रस्त भागात जाणे तसेच नदी-नाल्यांमध्ये उतरणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील इतर भागांतही नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून धुळे, वाशिम, अमरावती, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पुढील २४ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये झपाट्याने वाढतोय पाणीसाठा

Next Post

जळगावातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगावातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगावातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

July 31, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

जळगावसह राज्यात पावसाचा कहर; जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट, हतनूरचे ३६ दरवाजे उघडले

July 31, 2026
जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले

मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये झपाट्याने वाढतोय पाणीसाठा

July 31, 2026
एक शाम रफी के नाम : जळगावात आज मोहम्मद रफी यांना संगीतबद्ध आदरांजली

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page