देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय हवाई दलाने (IAF) मोठी भरती जाहीर केली आहे. ग्रुप ‘Y’ नॉन-टेक्निकल मेडिकल असिस्टंट (Intake 02/2027) पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवार 26 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी. एकूण गुणांसह इंग्रजी विषयातही किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत.
याशिवाय संबंधित विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत.
फार्मसी पदवीधारकांनाही संधी
12वीनंतर डिप्लोमा इन फार्मसी, बी. फार्मा किंवा बीएस्सी फार्मसी पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. मात्र, त्यांच्याकडे भारतीय फार्मसी परिषद (PCI) किंवा राज्य फार्मसी परिषदेकडील वैध नोंदणी असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा
12वी उत्तीर्ण उमेदवार: जन्म 1 जुलै 2006 ते 1 जुलै 2010 दरम्यान.
डिप्लोमा/बी.फार्मा/बीएस्सी फार्मसी उमेदवार: जन्म 1 जुलै 2003 ते 1 जुलै 2006 दरम्यान.
विद्यावेतन
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹14,600 विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिलिटरी सर्व्हिस पे (MSP) सह सुमारे ₹26,900 मासिक वेतन मिळेल. याशिवाय हवाई दलातील इतर शासकीय सुविधा आणि भत्तेही मिळणार आहेत.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ₹550 अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे.
26 जुलैपर्यंत अर्जाची संधी
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 26 जुलै 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत भरती संकेतस्थळावर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करत अर्ज पूर्ण करावा.भारतीय हवाई दलातील प्रतिष्ठेची नोकरी, आकर्षक वेतन, प्रशिक्षण आणि देशसेवेची संधी मिळवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे.















Discussion about this post