Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात! स्कूल व्हॅनला ट्रेनची धडक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 17, 2026
in क्राईम, राष्ट्रीय
0
पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात! स्कूल व्हॅनला ट्रेनची धडक
बातमी शेअर करा..!

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात शाळेच्या व्हॅनला भरधाव प्रवासी रेल्वेने जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्णसुबर्ण आणि गोबिंदपूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे फाटकावर घडली. सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन खासगी शाळेची व्हॅन शाळेकडे जात असताना रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात निमतिता–काटोया पॅसेंजर ट्रेनने व्हॅनला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की व्हॅनचा चक्काचूर झाला.

अपघातावेळी व्हॅनमध्ये चालकासह आठ जण प्रवास करत होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि कर्णसुबर्ण ब्लॉक रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना पुढील उपचारासाठी मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

फाटक खुले असल्याने दुर्घटना?

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रेल्वे क्रॉसिंगच्या एका बाजूचे फाटक बंद होते, मात्र दुसऱ्या बाजूचे फाटक उघडेच राहिल्याने व्हॅन चालकाने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भरधाव ट्रेन आल्याने हा भीषण अपघात झाला. रेल्वे फाटकावरील गेटमनने वेळेत फाटक बंद न केल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

चौकशीचे आदेश

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून सर्व बाबींची सखोल तपासणी केली जात आहे.

या दुर्दैवी अपघातामुळे शाळा परिसरात शोककळा पसरली असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमरावतीत ट्रक चालकाला जिवंत जाळणारा आरोपी अटकेत, रावेर पोलिसांची कारवाई

Next Post

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! भारतीय हवाई दलात मोठी भरती जाहीर; 26 जुलैपर्यंत करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! भारतीय हवाई दलात मोठी भरती जाहीर; 26 जुलैपर्यंत करा अर्ज

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! भारतीय हवाई दलात मोठी भरती जाहीर; 26 जुलैपर्यंत करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page