जळगाव । अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका धडक वक्तव्यानंतर आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तीव्र पडसाद जागतिक बाजारासह भारतीय बाजारपेठेवर उमटले आहेत. बुधवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर, आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा (१० ग्रॅम) १ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल २ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली.
त्यानुसार सोने (विनाजीएसटी) ₹1,43,500 प्रति 10 ग्रॅम, तर चांदी (विनाजीएसटी) ₹2,27,000 प्रति किलो दराने व्यवहार करत आहे. लग्नसराई संपल्यानंतर दागिन्यांची मागणी कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू होती. बुधवारी सोन्याच्या दरात तब्बल ₹3,000, तर चांदीच्या दरात ₹11,000 इतकी घसरण झाली होती. मात्र, आखाती देशांतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवल्याने दरात वाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
सराफा व्यापाऱ्यांच्या मते, मध्य पूर्वेतील तणाव कायम राहिल्यास आगामी काळात सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांना अधिक खर्च करावा लागू शकतो.















Discussion about this post