महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या मेगाभरती अंतर्गत विविध विभागांमधील एकूण २,६१९ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेत लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक या पदांचा समावेश आहे. राज्यभरातील हजारो उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आज २७ जून २०२६ पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17 जुलै 2026 पर्यंत आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, उमेदवारांना https://mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा लागणार आहे.
पदांचा तपशील
लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist)
कर सहाय्यक (Tax Assistant)
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)
उद्योग निरीक्षक (Industry Inspector)
भरतीसाठी पात्रता :
उद्योग निरीक्षक: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा (Diploma in Technology) किंवा विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.).
तांत्रिक सहायक: कोणत्याही शाखेतील पदवीधर.
कर सहायक :
१) कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
सहायक मोटार वाहन निरीक्षक :
१) १० वी उत्तीर्ण.
२) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य पात्रता.
लिपिक-टंकलेखक :
१) कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
परीक्षा शुल्क
अमागास (खुला) – Rs.394/-
मागासवर्गीय/आ.दु.घ /अनाथ – Rs.294/-
माजी सैनिक (फक्त गट-क संवर्ग) – Rs.44/-
वयोमर्यादा
वयोमर्यादा मोजण्याची दिनांक: 1 ऑक्टोबर 2026
कर सहायक (अमागास) : 18 वर्षे ते 38 वर्षे
अमागास : 19 वर्षे ते 38 वर्षे ( कर सहायक वगळता बाकी पदांसाठी )
वयोमर्यादा सवलत – मागासवर्ग : 43 वर्षे, दिव्यांग : 45 वर्षे, माजी सैनिक : नियमानुसार, इतर आरक्षण : शासन नियमानुसार
इतका पगार मिळेल?
उद्योग निरीक्षक – S-13: Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-
तांत्रिक सहायक – S-10: Rs.29,200/- ते Rs.92,300/-
कर सहायक – S-8: Rs.25,500/- ते Rs.81,100/-
लिपिक-टंकलेखक – S-6: Rs.19,900/- ते Rs.63,200/-
सहायक मोटार वाहन निरीक्षक – S-14: Rs.38,600 ते Rs.1,22,800/-
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |















Discussion about this post