जळगाव | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे सेना अद्याप सहा खासदारांच्या बंडाने पुरती सावरलेली नसतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यांनी तर ठाकरे सेनेचे किती आमदार फुटणार याचा आकडाच सांगितला, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांचे फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरू होत आहेत. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक टीका केली आहे. दौरे केलेच पाहिजे दौरे केल्याशिवाय काम होत नाही. मुलाला जमत नाही म्हणून बापाने तरी केलं पाहिजे. या शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचे उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.
फिरणारे नेते म्हणूनच एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे लोकांच्या मनात आहे लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या शेतकऱ्यांच्या , वारकऱ्यांच्या तसेच सर्वांच्या मनात आहे, असे मत ही त्यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी ऑपरेशन टायगर 3.0 वर मोठे भाष्य केले आहे. खासदारानंतर आता आमदार फुटणार असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. झालंय झालंय. तसेच होईल लवकरच होईल. थोडं थांबा, 14 आमदार नाही जास्तीत जास्त आमदार येतील. एकनाथ शिंदे हे बोलत नाही फक्त दाढीवर हात फिरवतात. जेव्हा शिंदे साहेब दाढीवर हात फिरवतात तेव्हा टायगर सक्सेस होतो.आणि हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी देखील स्वतः कबूल केलेला आहे. आता ठाकरेंचे आमदार देखील शिवसेनेत येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटली यांनी संकेत दिले आहे.















Discussion about this post