नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इंधनाचे वाढते दर या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय घेतले जात असतानाच, आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना प्रचंड वेग आला असून, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
या फेरबदलात सुमार कामगिरी असलेल्या काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून, दोन केंद्रीय मंत्र्यांची सुट्टी निश्चित मानली जात आहे. त्यांच्या जागी नवीन आणि कार्यक्षम चेहऱ्यांना संधी दिली जाईल.
महाराष्ट्रातील ‘या’ दोन खासदारांचे नाव आघाडीवर
या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला मोठे प्रतिनिधित्व मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील दोन प्रमुख खासदारांची नावे केंद्रीय मंत्रिपदासाठी जोरदार चर्चेत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार संजय दिना पाटील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यामुळे कोणत्याही क्षणी या फेरबदलाची घोषणा होऊ शकते.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांनी बंडखोरी करत मुंबईत शिंदे गटात प्रवेश केला. या मोठ्या राजकीय भूकंपामागे खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.















Discussion about this post