Monday, June 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘वरुणराजा’ रुसला! कृषी विभाग व मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना ‘हे’ मोठे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 15, 2026
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा
बातमी शेअर करा..!

राज्यातील शेतकरी राजा सध्या चिंतेत पडला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १५ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता; मात्र मान्सून अजूनही अरबी समुद्रातच रेंगाळला आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या विपरीत वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत मोठा अडथळा निर्माण झाला असून, तो एकाच ठिकाणी स्थिरावला आहे. आता हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, २० जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. या बदलत्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची धाकधूक कमालीची वाढली आहे.

यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा इशारा आधीच देण्यात आला आहे. त्यातच आता ‘एल निनो’चे एक मोठे संकट उभे ठाकले आहे. सध्या प्रशांत महासागरात ‘एल निनो’ पूर्णपणे सक्रिय असल्याने, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील मान्सून आजच्या घडीला धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आणि अपेक्षा २० जून रोजी होणाऱ्या मान्सूनच्या आगमनावर खिळल्या आहेत.

पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी आपली शेते पेरणीसाठी पूर्णपणे तयार ठेवली आहेत. शेतांची नांगरणी झाली असून, घरात बियाणे आणि खते आणून ठेवली आहेत. मात्र, वरूण राजा बरसण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मान्सून लांबल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना मोठे आवाहन केले आहे. “शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. हवामान विभाग आणि प्रशासनाकडून ज्यावेळी अधिकृतपणे सांगितले जाईल, त्याच वेळी शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कृषी विभागाचा मोठा इशारा: “घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट!”
मान्सून २० जूनला दाखल होईल असा अंदाज असला, तरी तो केवळ एक अंदाजच आहे. यापूर्वीचा १५ जूनचा अंदाज हुकल्याने कृषी विभाग सतर्क झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना कडक इशारा दिला आहे की, जोपर्यंत कृषी विभागाकडून अधिकृतपणे पेरणीचे आवाहन केले जात नाही, तोपर्यंत कोणीही पेरणी करू नये. अपुऱ्या पावसात पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन शेतकऱ्यांवर ‘दुबार पेरणी’चे मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाल्यावरच पुढील पाऊल टाकावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला ! पिकअप थेट विहिरीत कोसळून 14 जणांचा जागीच मृत्यू

Next Post

सरकारी नोकरीची तयारी करताय? मग ‘ही’ सुवर्णसंधी सोडू नका; UPSC मध्ये ५३८ जागांची बंपर भरती!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

सरकारी नोकरीची तयारी करताय? मग 'ही' सुवर्णसंधी सोडू नका; UPSC मध्ये ५३८ जागांची बंपर भरती!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

June 15, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगावात निवृत्तीवेतनधारकांसाठी जिल्हा पेन्शन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन

June 15, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

अखेर तारीख ठरली! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!

June 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page