Saturday, June 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचा ‘तो’ किस्सा सांगताना मंत्री महाजन खदखदून हसले; काय आहे तो किस्सा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या राजकारणात भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. एकमेकांना डिवचण्याची आणि आरोपांच्या फैरी झाडण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत. दरम्यान, जळगावात एका कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचा एक अजब किस्सा जाहीरपणे सांगितला. या किस्स्यामुळे उपस्थित नेत्यांमध्ये एकच हशा पिकला असला, तरी आता यावरून जळगावचे राजकारण कमालीचे तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमका काय आहे तो किस्सा?

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जळगाव शहराचे भाजप आमदार सुरेश भोळे यांचा १३ जून ला वाढदिवस असल्याने, मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना आगाऊ शुभेच्छा दिल्या. आमदार भोळेंना शुभेच्छा देत असताना महाजन यांना नाथाभाऊंच्या वाढदिवसाची आठवण झाली.

महाजन म्हणाले की, “एकदा नाथाभाऊंच्या वाढदिवसाला काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी थेट ‘एकनाथ खडसे अमर रहे… अमर रहे…’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली होती!” महाजन यांनी हा किस्सा सांगताच मंचावरील आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला. हा किस्सा सांगताना स्वतः गिरीश महाजन देखील खदखदून हसताना पाहायला मिळाले.

“व्हिडिओ काढू नका… शुटींग बंद करा!”
मंत्री गिरीश महाजन जेव्हा हा किस्सा सांगत होते, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना या विधानाचे गांभीर्य लक्षात आले. यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, हे ओळखून काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना तात्काळ “याचे मोबाईलवर शुटींग करू नका, व्हिडिओ काढू नका,” असे आवाहन केले. मात्र, तरीही हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता तो समोर आल्याने राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखा पसरत आहे.

जळगाव विधान परिषदेच्या रणधुमाळीत आधीच राजकीय वातावरण गरम आहे. त्यातच महायुतीच्या अधिकृत बैठकीनंतर हा प्रकार घडल्यामुळे आता भाजप आणि खडसे समर्थकांमध्ये नवा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. गिरीश महाजन यांनी जाहीरपणे उडवलेली ही खिल्ली एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता असून, यावर आता नाथाभाऊ काय पलटवार करतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या व्हिडिओवर एकनाथ खडसे यांची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धावपट्टीवर विमान उतरले अन्…; आसाममध्ये वायुसेनेच्या मालवाहू विमानाला भीषण अपघात

Next Post

कितीही रोखा, ज्याला जायचं तो जातोच; ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटलांचे ठाकरे गटाला सूचक विधान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

कितीही रोखा, ज्याला जायचं तो जातोच; ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटलांचे ठाकरे गटाला सूचक विधान

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र्रात तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

महाराष्ट्र्रात तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

June 13, 2026
आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले.. ; गिरीश महाजनांचा आमदार रोहित पवारांवर निशाणा

रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे..; मंत्री गिरीश महाजनांचा घणाघात

June 13, 2026
गाय-म्हशींसाठी जळगाव जिल्ह्यातील राबविले जाणार ‘वंधत्व निवारण अभियान’

पशुसंवर्धन विभागाची मोठी तत्परता; जळगावात ३५ जनावरांना सामूहिक विषबाधा, पण ‘त्या’ एका फोनमुळे टळली दुर्घटना!

June 13, 2026
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

विधान परिषद निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’ जाहीर

June 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page