तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण आणि अनुभवी व्यावसायिकांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) ने देशभरातील आपल्या ११ केंद्रांवर विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत एकूण ९५१ कंत्राटी पदे भरली जाणार आहेत.
या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती २० जून २०२६ पर्यंत सुरू राहील. इच्छुक उमेदवार cdac.in किंवा careers.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकतात. ही पदे नोएडा, बंगळूर, चेन्नई, पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, मोहाली, कोलकाता आणि इतर ठिकाणांसाठी आहेत.
विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीमध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही पदांचा समावेश असेल. यामध्ये नवशिक्यांसाठी प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट इंजिनिअरपासून ते सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट आणि प्रोजेक्ट टेक्निशियनपर्यंतच्या पदांचा समावेश आहे.
कोण अर्ज करू शकतो?
बहुतांश तांत्रिक पदांसाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून (AICTE/UGC द्वारे मंजूर) किमान ६०% गुणांसह बीई/बीटेक किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. काही केंद्रांवर, प्रोजेक्ट असोसिएट्ससाठी ५०% गुण देखील स्वीकारार्ह आहेत.
विज्ञान/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, एमई/एमटेक किंवा पीएचडी मधील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. प्रशासकीय/सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी, ५०% गुणांसह पदवी आणि संबंधित अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा: पदानुसार किमान आणि कमाल वयोमर्यादा ३० ते ५६ वर्षांपर्यंत आहे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५ वर्षांची, इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) प्रवर्गासाठी ३ वर्षांची आणि दिव्यांग/माजी सैनिकांसाठी ५ वर्षांची वयोमर्यादेत सवलत लागू आहे.
वयाची अट : ३० ते ५६ वर्ष
निवड प्रक्रिया
सी-डॅकने अधिकृत अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की, उमेदवारांची निवड केवळ तीन टप्प्यांवर आधारित असेल. लेखी परीक्षा केवळ आवश्यक असल्यास (लागू असल्यास) घेतली जाईल.
टप्पा १: प्राप्त अर्जांची प्राथमिक छाननी
टप्पा २: लेखी परीक्षा (आवश्यक असल्यास)
टप्पा ३: वैयक्तिक मुलाखत















Discussion about this post