Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बारडोलीजवळ जामनेर-धुळे आगाराच्या एसटीचा भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील बस चालकासह सात जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
बारडोलीजवळ जामनेर-धुळे आगाराच्या एसटीचा भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील बस चालकासह सात जणांचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव/सुरत : गुजरातमधील बारडोली परिसरात मंगळवारी झालेल्या भीषण एसटी बस अपघाताने महाराष्ट्रासह गुजरातमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत जामनेर आणि धुळे आगाराच्या दोन एसटी बसचा समावेश असून या अपघातात जळगाव जिल्ह्यातील चालकासह सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय राज्याचे परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत-धुळे मार्गावरील एक एसटी बस गुजरातमधील व्यारा परिसरातून जात असताना मागून आलेल्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बस दुभाजक ओलांडून विरुद्ध मार्गावर गेली. त्याचवेळी जामनेरहून सुरतकडे जाणारी दुसरी एसटी बस समोरून येत होती. दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या धडकेनंतर एक बस रस्त्याखाली घसरली आणि काही क्षणांतच तिला आग लागली.

आगीचे स्वरूप इतके भीषण होते की अनेक प्रवासी त्यात अडकले. चालकांसह काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेकांना गंभीर भाजल्याच्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस जामनेर आगाराची होती. या बसचे  कुऱ्ह येथील रहिवासी असलेले एसटी बस चालक यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये जळगाव जिल्ह्यातील काही प्रवाशांचा समावेश असून त्यांच्यावर गुजरातमधील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आगीत मृतदेह पूर्णपणे जळाल्याने मृतांची ओळख पटविणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे. त्यामुळे मृत व्यक्तींची खात्रीशीर ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने संकलित करण्यात येत असून त्यांची तपासणी केली जाणार आहे. अहवाल आल्यानंतरच मृतांची अधिकृत ओळख जाहीर केली जाईल. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बारडोली येथील प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला असून जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पथक गुजरातकडे रवाना करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या दुर्घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Next Post

खुशखबर ! केरळात मान्सून कोणत्याही क्षणी धडकणार, महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला महत्वाचा अंदाज

खुशखबर ! केरळात मान्सून कोणत्याही क्षणी धडकणार, महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

August 23, 2026
जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

August 23, 2026
आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार

पुणे आयकर विभागात 85 जागांची भरती; 10वी/12वी पाससाठी संधी

August 23, 2026
रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; बारामतीत खळबळ

रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; बारामतीत खळबळ

August 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page