बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी आणि सुवर्णसंधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) बंपर भरती जाहीर केली आहे. स्टेट बँकेत ७,००० पेक्षा जास्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, या नोकरीसाठीची अर्जप्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
स्टेट बँकेत अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ७१५० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छुकांनीhttps://sbi.bank.in/web/careers/current-openings वर जाऊन अर्ज करायचा आहे. याचसोबत https://apprenticeshipindia.org, https://nsdcindia.org/apprenticeship या वेबसाइटवर जाऊनदेखील अर्ज करु शकतात. स्टेट बँकेची ही सर्वात मोठी भरती आहे. याआधी २०२३ मध्ये ६००० पदांसाठी अप्रेंटिस भरती काढली होती.
स्टेट बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांना स्थानिक भाषेची परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवाराला स्थानिक भाषा लिहता,वाचता यायला हवी. जर त्यांना स्थानिक भाषा येत नसेल तर त्यांची निवड केली जाणार नाही.
स्टेट बँकेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षांमधील असावी. या नोकरीसाठी सर्वात आधी लेखी परीक्षा, त्यानंतर लँग्वेज टेस्ट, कागदपत्र पडताळणी होणार आहे. यामध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना काम करता येणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी sbi.co.in वर जा.
यानंतर होमपेजवर करिअर ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
यानंतर अप्रेंटिस भरती संबंधित लिंकवर क्लिक करा. फॉर्म भरा.
यानंतर शुल्क सबमिट करा आणि फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.















Discussion about this post