मध्यपूर्वेतील वाढत्या राजकीय तणावाचे थेट पडसाद देशांतर्गत इंधन बाजारावर उमटले आहेत. शनिवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली असून, गेल्या १० दिवसांतील ही तिसरी दरवाढ ठरली आहे. ताज्या बदलानुसार पेट्रोल प्रतिलिटर ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे.
या सलग दरवाढीमुळे अवघ्या १० दिवसांत इंधनाचे दर सुमारे ५ रुपयांनी वधारले आहेत. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर १०७.५५ रुपयांवरून १०८.४२ रुपये, आणि डिझेलचे दर ९४.०५ रुपयांवरून ९४.९६ रुपये प्रति लिटर झाले. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये पेट्रोलचे दर १०९.६१ रुपयांवरून ११०.४८ रुपये, आणि डिझेलचे दर ९६.९५ रुपये प्रति लिटर झाले. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर पूर्वी ₹104.54 प्रति लिटर होता, तो आता ₹105.41 प्रति लिटर झाला आहे. त्याचप्रमाणे, डिझेलचे दर ₹96.16 वरून ₹97.07 प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत.
दरम्यान, इंधन दरवाढीमुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर खरेदीसाठी गर्दी झाली असून तुटवड्याच्या अफवा पसरत आहेत. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने हे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत. “देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून बाजारात गर्दी करू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे जाहीर आवाहन मंत्रालयाने केले आहे.















Discussion about this post