धुळे | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. धुळ्यात अजित पवार (सुनेत्रा पवार) गटाच्या महिला नेत्या रिता बाविस्कर यांच्या वाहनावर कथित गोरक्षकांनी मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला.
बाविस्कर या आपल्या वाहनातून काही कामानिमित्त अमळनेर येथून धुळेमार्गे आपल्या वाहनातून जात होत्या. त्यावेळी धुळे तालुक्यातील वणी याठिकाणी कथित गोरक्षकांनी संबंधित वाहनात गोवंश जनावरे चोरून नेले जात असल्याच्या संशयावरून संबंधित वाहन रोखली. त्यानंतर लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून वाहन अडविण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमध्ये रीता बाविस्कर या थोडक्यात बचावल्या. या संदर्भात रिता बाविस्कर यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात या कथित गोरक्षकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. धुळे तालुका पोलिसांनी बाविस्कर यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करीत दोन जणांच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. तर एक जण अद्याप फरार असून त्याचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. किर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह दहा ते पंधरा गोरक्षकांनी हल्ला केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रीता बाविस्कर यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली















Discussion about this post