Friday, June 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 6, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर
बातमी शेअर करा..!

अहिल्यानगर: सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून सासरी आलेल्या एका २३ वर्षीय निष्पाप विवाहितेचा हुंड्याच्या लालसेपोटी अत्यंत वेदनादायक अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या अमानुष शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून प्रिया शुभम ढगे या विवाहितेने विहिरीत उडी मारून आपले आयुष्य संपवले. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घर बांधण्यासाठी माहेरून ४ लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून प्रियाचा छळ सुरू होता. प्रियाचा नवरा शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे हे तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. इतकेच नव्हे, तर तिला अनेकदा उपाशीपोटी ठेवले जात असल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे. २०२४ पासून सुरू असलेला हा छळ दिवसेंदिवस असह्य झाल्याने अखेर प्रियाने टोकाचे पाऊल उचलले.

प्रियाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एकरुखे गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत मृत प्रियाचा नवरा शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे या तिघांनाही अटक केली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.एका निष्पाप मुलीच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट झाला. हुंड्याच्या लालसेपायी अजून किती जीव जाणार? हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.

आत्महत्या केलेल्या प्रियाचा शेवटचा मोबाईल मॅसेज –
ताई/काकी,

तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता मला काहीच नको आहे. मी खूप सहन केलं. माझी श्रेया माझ्याजवळ नाही. मी तिला खूप मिस करते पण ती नाही येणार माझ्याकडे. माझा नवरा शुभम , मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, पण त्याने कधीच माझ्यावर तसं प्रेम केलं नाही. त्याचं प्रेम फक्त त्याच्या कुटुंबावर आहे. आज सगळं काही माझ्या सासूमुळे झालं आहे. फक्त आमचं भांडण कसं होईल हेच तिला पाहिजे. ताई श्रेयाची काळजी घे. तुझ्यावर सोपवून जाते मी श्रेयाला. आज जगामध्ये मी नाही. पण शुभमवर प्रेम करत राहील मी. फक्त एकच इच्छा आहे शुभमला विचार मी काय केलं होतं? की ते मला सोडून गेले.

माझी श्रेया मला मम्मी म्हणायची. एक महिना झाला तिला पाहिलंही नाही. खूप मिस करतेय श्रेयाला. सॉरी श्रेया तुझ्यासाठी मी काहीच करू शकले नाही. आज सगळे बोलत आहेत की मी चूकी केली आहे. पण मी चोरी नाही केली. अक्काचे पैसेही नाही घेतले. मला नोकरी करायची होती पण घरचे नाही बोलले. फक्त आता कोणालाही टेन्शन नाही द्यायचे. शुभमला सांगा, करा मजा आता मी गेले तुमच्या लाईफमधून आता. माझी शेवटची एकच इच्छा आहे माझ्या श्रेयाचा सांभाळ कर ताई. आता मला काहीच नको आहे. सॉरी Love you Shreya’

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात खरीप २०२६ साठी कृषि निविष्ठांवर नियंत्रण कक्ष स्थापन

Next Post

दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच केला पतीचा खून; जळगावातील धक्कादायक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच केला पतीचा खून; जळगावातील धक्कादायक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पंढरपूरला जाण्यासाठी ‘या’ स्पेशल गाड्या ‎खान्देशातून धावणार

आषाढी एकादशीसाठी रेल्वेची विशेष तयारी; भुसावळ-पंढरपूरसह चार विशेष गाड्या धावणार

June 26, 2026
अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

June 26, 2026
यावल अभयारण्यात वनविभागाची धडक कारवाई; तस्करीसाठी साठवलेले लाखांचे सागवान लाकूड जप्त

यावल अभयारण्यात वनविभागाची धडक कारवाई; तस्करीसाठी साठवलेले लाखांचे सागवान लाकूड जप्त

June 26, 2026
म्हणून ते आता फडणवीसांशी गोड बोलताय; मंत्री गुलाबराव पाटीलांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

‘ठाकरेंचे आणखी आमदार शिंदे गटात येणार? मंत्री गुलाबराव पाटलांच्या दाव्याने खळबळ

June 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page