संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory Chanda) मध्ये रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘डेंजर बिल्डिंग वर्कर’ (DBW) या पदासाठी तब्बल ४०० रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारली जाणार नाही.
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे NCVT (NCTVT) कडून मिळालेले राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र (NAC) असणे आवश्यक आहे.
पात्र ट्रेड्स: AOCP, IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक.
वयोमर्यादा आणि सवलत
८ मे २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे वयात सूट देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असली तरी, उमेदवारांना अर्जाची प्रत खालील पत्त्यावर पाठवावी लागणार आहे:
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य महाव्यवस्थापक (The Chief General Manager), ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, जिल्हा: चंद्रपूर (महाराष्ट्र), पिन- ४४२५०१.
महत्त्वाची माहिती
नोकरी ठिकाण: चंद्रपूर (महाराष्ट्र)
परीक्षा फी: नाही (सर्व प्रवर्गांसाठी मोफत)
अंतिम तारीख: अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ०८ मे २०२६ आहे.
इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post