या घडामोडींमुळे इराणआणि आखाती प्रदेशातील तणाव आणखी तीव्र झाला आहे. जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत असून, त्याचे पडसाद थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पूर्ण युद्ध टाळत मर्यादित लष्करी कारवाईचा पर्यायही अमेरिका तपासत असल्याची माहिती समोर आली आहे. निवडक लष्करी तळांवर हल्ले करून इराणवर दबाव वाढवणे आणि चर्चेतील कोंडी फोडणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. वॉशिंग्टनमध्ये विविध युद्धपर्यायांवर चर्चा सुरू असून ट्रम्प यांनी त्याबाबत संकेत दिले आहेत.
अमेरिकेच्या या भूमिकेला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे नौदल प्रमुख Shahram Irani यांनी ट्रम्प यांची धमकी “हास्यास्पद” असल्याचे सांगत ती फेटाळून लावली. अमेरिकन सैन्याच्या कोणत्याही आक्रमक हालचालीला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणी सैन्य पूर्णतः सज्ज असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
या तणावाचे परिणाम जागतिक बाजारपेठेत तात्काळ दिसून आले. कच्च्या तेलाच्या किंमतीत ७ ते ८ टक्क्यांची वाढ झाली असून अमेरिकन क्रूड ऑईल प्रति बॅरल १०४.२४ डॉलरवर पोहोचले आहे, तर ब्रेंट क्रूड १०२.२९ डॉलरवर गेले आहे. भूराजकीय तणावामुळे इंधन दरवाढीचे संकट पुन्हा गडद झाले असून, जगभरातील अर्थव्यवस्थांवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post