फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रक्षा संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO मध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.डीआरडीओने इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड एलाइड सायन्स (INMAS), दिल्लीत भरती जाहीर केली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.
डीआरडीओमधील अप्रेंटिसशिप ही इंजिनियरिंग आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी आहे. या तरुणांना रक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
पात्रता
डीआरडीओमधीस या भरतीद्वारे ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई किंवा बी.टेक पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निशिनयन पदासाठी इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा १८ वर्षे असावी.
डीआरडीओमधील ही अप्रेंटिसशिप १२ महिन्यांची असणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १२,००० ते १२,३०० रुपये स्टायपेंड तर डिप्लोमाधारकांना १०,००० ते ११,००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला चांगल्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला DRDO च्या वेबसाइटवर मिळणार आहे.















Discussion about this post