आम आदमी पक्षामध्ये मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला असून पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेतील नव्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निर्णयाबाबतचे अधिकृत पत्र राज्यसभा सचिवालयाला सादर करण्यात आले असून पक्षाच्या संसदीय रणनीतीत हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राघव चड्ढा हे राज्यसभेत खासदार आहेत. राघव चड्ढा हे राज्यसभेतील पक्षाचे प्रमुख युवा नेते मानले जात होते ते अभिनेत्री परिणिती चोप्राचे पती आहेत. राघव चड्ढा हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीकडून राज्यसभेवर गेले आहेत. त्यांना आता पक्षाने मोठा धक्का दिला आहे. राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा पक्षाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शांत असल्याची चर्चा होती. विशेषतः पक्षातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे ते पक्षापासून दूर जात असल्याचे संकेत असल्याचेही काही राजकीय विश्लेषकांचे मत होते.
अलीकडेच आबकारी धोरण प्रकरणात पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना दिलासा मिळाल्यानंतरही राघव चड्ढा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच त्यांची केजरीवाल यांच्यासोबत भेट झाल्याचीही माहिती समोर आली नव्हती. या पार्श्वभूमीवर पक्षाने घेतलेला हा निर्णय मोठा राजकीय बदल म्हणून पाहिला जात आहे.















Discussion about this post