महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ५७१ पदे भरण्यात येणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
या भरतीअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त सरकारी वकील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे. कायद्याशी संबंधित पदांसाठी कायद्याची पदवी, तर वैद्यकीय पदांसाठी एमबीबीएस पदवी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रांची छाननी आणि मुलाखत या टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. पदनिहाय पात्रता व इतर अटींबाबत सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post