रामनवमीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँक आणि शाळांना सुट्ट्या असणार आहे. परंतु, महाराष्ट्रात बँकांना सुट्टी असणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. २६ मार्च रोजी श्री रामनवमीनिमित्त अहमदाबाद, ऐझॉल, चंदीगड, डेहरादून, जयपूर, कानपूर, कोलकत्ता, लखनऊ, रांची आणि शिमला येथील बँका बंद असणार आहेत. तर महाराष्ट्रातील बेलापूर, मुंबई आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्येही बँका बंद राहतील.
याशिवाय काही शहरांमध्ये शुक्रवार, २७ मार्च रोजी श्री रामनवमी (चैते दसैं) हा सण साजरा केला जाईल. यामुळे या शहरांमधील बँका बंद राहतील. यामध्ये भोपाळ, भुवनेश्वर, गंगटोक, हैदराबाद, पाटणा आणि विजयवाडा या शहरांचा समावेश आहे.
२८ मार्च आणि २९ मार्चला बँक बंद
यानंतर २८ मार्च आणि २९ मार्च रोजी देखील चौथा शनिवार, रविवारचा समावेश असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ३ दिवस बँका बंद असणार आहेत. भारतातील बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात, कारण त्या स्थानिक सण आणि परंपरांवर आधारित असतात.
दरम्यान, बँकेच्या शाखा बंद असूनही देशभरात ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील. ग्राहक सुट्ट्यांदरम्यान पैसे हस्तांतरण, बिल भरणे आणि इतर आर्थिक व्यवहार डिजिटल माध्यमांद्वारे करू शकतात.















Discussion about this post