Wednesday, March 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रेंगाळलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाबाबत सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
रेंगाळलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाबाबत सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
बातमी शेअर करा..!

जळगाव | जिल्ह्याच्या शेती सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाकडून या प्रकल्पाच्या १४०७.२० कोटी रुपयांच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेवर २४ मार्च रोजी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या या प्रकल्पाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे. व यातून सुमारे 9128 हेक्टर क्षेत्र सिंचन / ओलीताखाली येणार आहे.

तापी नदीवरील हा प्रकल्प यावल तालुक्यासाठी जीवनदायी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ११ गावांतील एकूण १२२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. प्रकल्पाच्या खर्चामध्ये कालानुरूप वाढ झाली असून १९९७-९८ मध्ये रु. 198 कोटी रुपयांची मूळ मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २०११-१२ मध्ये रु. 699.48 कोटी रुपयांची प्रथम सुधारणा, २०१७-१८ मध्ये रु. ९६८.9७ कोटी रुपयांची द्वितीय सुधारणा करण्यात आली. आता २०२३-२४ मध्ये तृतीय सुधारणा करत प्रकल्पाची किंमत रु. १४०७.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

प्रकल्पाचा लाभ-खर्च गुणोत्तर (B/C Ratio) १.९१ असून अंतर्गत परतावा दर (IRR) १०.७२ टक्के आहे, यामुळे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम मानला जात आहे. बॅरेजची एकूण साठवण क्षमता 4.11 टीएमसी असून १८.३० x १६.७६ मीटर आकाराचे १८ दरवाजे बसविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १९६१.४७ हेक्टर जमीन पूर्णपणे संपादित करण्यात आली आहे. बॅरेजचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून बुडीत क्षेत्रातील ४ पुलांपैकी २ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २ पुलांची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.

सध्या बॅरेजमध्ये जास्तीत जास्त २.८९ टीएमसी (70 टक्के) पाणीसाठा करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन आणि सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी मंत्री, गिरीश महाजन सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील सिंचनाच्या विकासकामांना गती मिळाली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याने यावल तालुक्यातील शेतकरी बांधवानी मंत्री, गिरीश महाजन यांचेसह शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लक्षवेधी लोकांना ब्लॅकमेलिंगसाठी वापरल्या जातात का? विधानपरिषदेत मंत्री महाजनांचे खडसेंवर टीकास्त्र

Next Post

खून प्रकरणातील गुन्हेगारासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात ; दोन पिस्तूल व ८ तलवारी जप्त !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खून प्रकरणातील गुन्हेगारासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात ; दोन पिस्तूल व ८ तलवारी जप्त !

खून प्रकरणातील गुन्हेगारासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात ; दोन पिस्तूल व ८ तलवारी जप्त !

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

LPG सिलिंडर बुकिंगच्या नव्या नियमांमुळे गृहिणींच टेन्शन वाढणार ; नेमके काय आहेत नियम?

March 25, 2026
इंडिया पोस्टमध्ये १२००० हून अधिक पदांची भरती ; 10वी पास त्वरित अर्ज करा

नंदुरबार पोस्ट व पासपोर्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; शहरात खळबळ

March 25, 2026
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

उद्या रामनवमीनिमित्त बँक सुरू असणार की बंद? बँकेत जाण्याआधी एकदा यादी तपासा

March 25, 2026
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

March 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page