जळगाव । सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून अशातच सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली आहेत. सोन्याचे दर जरी घसरले असले तरीही ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीयेत. कारण अद्यापही सोन्याचे दर दीड लाखाच्यावर आहेत.
जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात आज १ हजारांची घसरण झाली आहे तर चांदीचे दर ५ हजारांनी घसरले आहे. आज १ तोळा सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ६२ हजार २२२ रुपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ६७ हजार ८०० रुपयांवर पोहचले आहेत. सोने चांदीचे भाव कमी झाले असले तरीही ते १ लाख ६० हजारांच्या पुढेच आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही.
सोन्याच्या दरात गेल्या वर्षभरापासून वाढत आहेत. सोन्याचे दर सर्वाधिक १.८० हजारांच्या घरात गेले होते. त्यानंतर आता मागच्या महिन्याभरात हे दर २० हजारांनी कमी झाले आहेत. भविष्यातदेखील सोन्याचे दर घसरतील, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. जर सोन्याचे दर घसरले तर खरेदीदारांना दिलासा मिळेल.
गुडरिटर्न्सनुसार सोन्याचे भाव
सध्याच्या गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,५९,६६० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,२७,७२८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १०,३०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १,९६,६०० रुपये झाले आहेत.
चांदीचे दर
गुडरिटर्न्सनुसार, आज १ किलो चांदीचे दर २,७५,००० रुपये झाले आहेत. या दरात ४,९०० रुपयांची घसरण झाली आहे.















Discussion about this post