Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 14, 2026
in नोकरी
0
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार
बातमी शेअर करा..!

राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल २१ वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शासनाने ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ तयार करत नवीन पात्रता व निकष निश्चित केले असून, त्याअनुसार लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

२००५ नंतर शिक्षकेतर पदांची भरती बंद असल्याने अनेक शाळांमध्ये प्रशासकीय कामकाजावर ताण निर्माण झाला होता. विविध कर्मचारी संघटनांनी याविरोधात दीर्घकाळ आंदोलन व पाठपुरावा केला. २०१९ मध्ये सुधारित आकृतीबंध जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष भरतीला गती मिळाली नव्हती. आता २०२६ मध्ये शासनाने नवीन नियम लागू करण्याची तयारी केल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नव्या आकृतीबंधानुसार राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पदांची निर्मिती होणार आहे. यात कनिष्ठ लिपिकांची १७,६९५ पदे, वरिष्ठ लिपिकांची ४,९१२ पदे, मुख्य लिपिकांची ९२३ पदे, ग्रंथपालांची २,११८ पदे, नववी-दहावी साठी प्रयोगशाळा सहायकांची ४,६८५ पदे आणि उच्च माध्यमिक स्तरासाठी २,०४० प्रयोगशाळा सहायक पदे अशी एकूण जवळपास ३० हजार पदांची भरती अपेक्षित आहे.

नवीन नियमांनुसार कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीसह मराठी टंकलेखन ३० शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रतिमिनिट गतीचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. वरिष्ठ व मुख्य लिपिक पदे ही कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांमधून ज्येष्ठता व गुणवत्ता यांच्या आधारे पदोन्नतीने भरली जाणार आहेत.

ग्रंथपाल पदासाठी ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा पदविका आवश्यक असेल, तर प्रयोगशाळा सहायक पदासाठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. शिपाई (सेवक) पदासाठी किमान बारावी उत्तीर्णता आवश्यक करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील अनेक शाळांमधील रिक्त पदे भरली जाणार असून प्रशासकीय कामकाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याने बेरोजगार तरुणांमध्येही या निर्णयाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

Next Post

राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठ्या उसळीनंतर आज सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या; जाणून घ्या नवीन दर..

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर

March 14, 2026
राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

March 14, 2026
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

March 14, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page