Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धक्कादायक ! बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 14, 2026
in महाराष्ट्र
0
धक्कादायक ! बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक
बातमी शेअर करा..!

मुंबई । नाशिक विभागातील शिक्षण क्षेत्रात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तत्कालीन तीन शिक्षण उपसंचालकांसह तब्बल ८४१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०१९ ते जून २०२५ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य शालार्थ आयडी तयार करण्यात आले. या आयडींच्या आधारे वेतन बिले तयार करून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

तपासात असेही समोर आले आहे की तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्या कार्यकाळात ८५ संशयास्पद शालार्थ ड्राफ्ट तर भाऊसाहेब चव्हाण यांच्या काळात तब्बल ७४७ ड्राफ्ट तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील काही प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून शालार्थ आयडी मंजूर करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

शिक्षण आयुक्तांकडे तक्रार आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आले आहे. तपासादरम्यान काही कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून बनावट नोंदी केल्याचेही आढळून आले. शिक्षण उपनिरीक्षक श्रीधर देवरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

SITने २०१९ ते २०२५ या काळातील शालार्थ आदेशांची सखोल पडताळणी केली असता अनेक आदेश कार्यालयीन जावक नोंदीशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. या तपासातूनच बनावट आयडी आणि वेतन बिलांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणती नावे समोर येतात आणि शासन कोणती कारवाई करते याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

Next Post

जळगावसह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजावर चिंतेचे सावट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सावधान! राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

जळगावसह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजावर चिंतेचे सावट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

March 14, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

March 14, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगाव येथे १६ मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार

March 14, 2026
सावधान! राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

जळगावसह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजावर चिंतेचे सावट

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page