जळगाव । जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांनी राज्यभरात संपर्क अभियान सुरू केले आहे. फुटीनंतर प्रथमच शरद पवार जळगाव दौऱ्यावर येणार आहे.
गेल्या महिन्यात त्यांचा दौरा जाहीर करण्यात आला होता; परंतु खराब वातावरणामुळे तो स्थगित झाला होता. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जळगाव शहरात त्यांची जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे. अद्याप तारीख निश्चित नसली तरी ४ सप्टेंबर रोजी दौरा निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दौऱ्याच्या चर्चेला जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे.















Discussion about this post