सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत असिस्टंट ज्युनिअर ग्रेड ए , ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ८ मार्चपासून सुरु झाली असून त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच अर्ज करायचे आहे.
आयडीबीआय बँकेतील ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी इच्छुकांनी idbibank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करावेत.
पात्रता
आयडीबीआय बँकेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन किंवा इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेली असावी. २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी आधी माहिती वाचा त्यानंतर अर्ज करावेत.
आयडीबीआयमधये एकूण १३०० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड १साठी २०० पदे असणार आहेत.JAM ग्रेड-ओसाठी असणार आहेत.
अर्ज कसा करावा
सर्वात आधी तुम्हाला idbibank.in वर जायचे आहे.
यानंतर करिअर ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर संबंधित लिंकवर क्लिक करा.
यानंतर Click here for New Registration वर क्लिक करा. सर्व माहिती भरुन रजिस्ट्रेशन करा.
यानंतर लॉग इन करुन संपूर्ण फॉर्म भरा. कागदपत्र, फोटोग्राफ भरा.
यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा. त्याआधी प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post