Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

जनता शासनाच्या दारी नाही… शासनच जनतेच्या दारी”; महाराजस्व समाधान शिबिरातून शेकडो नागरिकांना योजनांचा थेट लाभ

जळगाव |छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभे करताना “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” हा विचार ठेवला होता. त्याच विचाराने शासन आज जनतेच्या दारी पोहोचत आहे. एखाद्या गरीब आईला तिच्या मुलासाठी दाखला मिळणे, एखाद्या शेतकऱ्याचा जमीन प्रश्न सुटणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुल मिळणे… या आनंदातूनच शासनाच्या कार्याचे खरे समाधान मिळते. गोरगरिबांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असून, सेवा करण्यासाठीच आपले जीवन आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भोकर व आसोदा येथे त्यांच्या हस्ते आयोजित “महाराजस्व समाधान शिबिरा”च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी एखाद्या साध्या दाखल्यासाठी नागरिकांना तहसील, पंचायत समिती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता शासनाने ठरवले आहे की “जनता शासनाच्या दारी उभी राहणार नाही, शासनच जनतेच्या दारी जाईल.” या संकल्पनेतूनच महाराजस्व समाधान शिबिर सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षांत जिल्ह्यात हजारो लाभार्थ्यांना या शिबिरातून सातबारा, उत्पन्न दाखले, घरकुल तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचाही उल्लेख केला. सरकारने दिलेला शब्द पाळत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री म्हणून प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी लोकांशी संवेदनशीलतेने वागावे, कारण शासनाच्या टेबलापलीकडे एका कुटुंबाचे आयुष्य उभे असते, अशी जाणीवही त्यांनी करून दिली.

प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी प्रस्ताविकात अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्राजक्ता केदार व उपशिक्षक सुनील पाटील यांनी केले, तर तहसीलदार शीतल राजपूत यांनी आभार मानले.

आसोदा येथे विद्यार्थ्यांची बहिणाबाई चौधरींवर आधारित काव्यनाटिका

जळगाव तालुक्यातील आसोदा येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ कार्यक्रमात स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित काव्यनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या काव्यातील ग्रामीण जीवन, कष्टकरी संस्कृती आणि जीवनमूल्ये प्रभावी अभिनयातून उभी केली. या सादरीकरणाला पालकमंत्र्यांसह मान्यवर व नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

असा देण्यात आला लाभ
या दोन्ही शिबिरांमध्ये कृषी, महसूल, पशुसंवर्धन, भूमी अभिलेख, महिला बचत गट, आरोग्य विभाग आदी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. तसेच रहिवास प्रमाणपत्र, डिजिटल ७/१२, अनु.जमाती जात प्रमाणपत्र, संजय गांधी व श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग लाभार्थी योजना, जिवंत ७/१२ वारस नोंदी, पोटखराब प्रकरणे, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड वाटप, फार्मर आयडी, आयुष्मान कार्ड आदी विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यात असोदा येथे ६१३ तर भोकर येथे ६७७ अशा एकूण १२९० लाभार्थ्यांना विविध सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
भोकर येथे सरपंच प्रमिलाबाई सोनवणे, मंडळ अधिकारी आशिष वाघ , असोदा मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, बालाशेठ राठी, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, गोपालजी बाहू, डॉ. सत्वशील पाटील, भरत बोरसे, उप तालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, दत्तू आबा सोनवणे, किसन सोनवणे, छोटू सरकार, सुभाष बडगुजर, रमेश आप्पा पाटील, डॉ. दिलीप लाठी उपस्थित होते. तसेच असोदा येथे सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, रवींद्र देशमुख, दूध संघाचे खेमचंद महाजन, सुभाष महाजन, अनिल महाजन, किशोर चौधरी, गिरीश भोळे, अजय महाजन, उमेश बाविस्कर, महेंद्र नारखेडे, संजोग कोळी, बाळकृष्ण पाटील तसेच श्रीराम मंदिराचे ट्रस्टी तसेच भोकर व आसोदा परिसरातील सरपंच, उपसरपंच, लाभार्थी, अधिकारी – कर्मचारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

Next Post

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगावच्या राणी लक्ष्मीबाई महिला ITI मध्ये ‘निदेशक’ पदांसाठी भरती

April 21, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर.. ; उद्धव ठाकरेंनीसत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ

April 21, 2026
चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

April 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page