Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 5, 2026
in जळगाव जिल्हा
0
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव : तालुक्यातील दस्केबर्डी गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना रस्ते अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी रात्री दस्केबर्डीचे सरपंच भगवान उत्तम देवरे आणि उपसरपंच ईश्वर उर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे हे बुलेट मोटारसायकलवरून चाळीसगावहून गावाकडे परताना त्यांच्या मोटारसायकलला शिंदवाडी शिवारात समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही खाली पडले असून सरपंच देवरे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजले होते. मात्र उपसरपंच ईश्वर अहिरे यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली.

मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान पिकअप वाहनाचा शोध घेऊन वाहन मालकास ताब्यात घेतले असता, दस्केबर्डी गावातील राजकीय मतभेदातून हा कट रचल्याचे समोर आले.

या प्रकरणात भीमराव पांडुरंग रोकडे, सचिन भीमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी आणि लक्ष्मण अशोक महाजन (रा. वाडे, ता. भडगाव – पिकअप मालक) या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी संगनमत करून सरपंच व उपसरपंचांना ठार मारण्याच्या उद्देशानेच मोटारसायकलला पिकअपने धडक दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अपघाताचे कलम कमी करून खुनाचा प्रयत्न व कट रचल्याची गंभीर कलमे लागू केली आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय लाटे करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

Next Post

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page