जळगाव : बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली असून, तपासाची व्याप्ती आता थेट जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणातील सातव्या आरोपीला अटक करण्यात आली असून तो चोपडा तालुक्यातील चऱ्हाडी येथील रहिवाशी आहेत. सतीश चौधरी असं त्याच नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
सतीश हा इलेक्ट्रिशियन असून त्याला बोगस आधारकार्ड बनवल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलीय त्याला आज अंबरनाथच्या चिखलोली न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
स्त्रीबीज तस्करी प्रकरणात याआधी सहा जणांना अटक करण्यात आली होती.. सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे, सोनल गरेवाल, सुमित सोनकांबळे यांच्या अटकेनंतर कालच बदलापूर पोलिसांनी नाशिक मधून डॉक्टर अमोल पाटीलला अटक केली होती. त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. त्यानंतर पोलिसांनी बोगस आधार कार्ड बनवणारा आरोपी सतीश चौधरी याला अटक करण्यात आलीय.















Discussion about this post