सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सोनं-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात आज ७०० रुपयांची घट झाली असून, त्यानुसार जळगावमध्ये सोन्याचे नवीन दर १,६१,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. जीएसटीसह सोनं खरेदी करताना ग्राहकांना १,६६,१३९ रुपये खर्च करावे लागणार आहेत.
चांदीच्या दरात देखील मोठी घसरण नोंदवली गेली आहे. १ किलो चांदीचे दर २,७२,००० रुपये झाले असून, जीएसटीसह चांदी खरेदी करताना २,८०,१६० रुपये खर्च करावा लागणार आहे.
सोनं-चांदीच्या या दरघसरणीमुळे जळगावकरांसाठी खरेदीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या मते, आगामी काही दिवसांत बाजारात स्थिरता येण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी योग्य काळ निवडावा.















Discussion about this post