तेहरान : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलने ३ प्रमुख हल्ले राबवले, ज्यामध्ये तेहरानसह इराणमधील सुमारे ३० ठिकाणी लक्ष्य साधण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, तेहरानमधील मेहराबाद विमानतळावरही हल्ला झाला आहे. इस्राइलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
हल्ल्याचा उद्देश इराणमधील महत्वाच्या नेत्यांना टार्गेट करणे असल्याचे समजते. इस्रायलच्या राष्ट्रपतींना या हल्ल्यानंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. इराणकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री बेन काट्झ यांनी हल्ल्याची पुष्टी केली असून, “आयडीएफने खबरदारीच्या उपाय म्हणून हल्ला केला. हल्ल्यापूर्वी नागरिकांना सतर्क केले गेले आणि सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले” असे सांगितले.
हल्ल्यानंतर इस्रायलने आपल्या हवाई सीमांना बंदी घातली आहे. देशातील सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद करण्यात आली आहेत, नागरिकांना घरात राहण्यास सांगितले गेले आहे, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. इस्रायल सरकारच्या माहितीनुसार, हा हल्ला बचावात्मक उपाय म्हणून करण्यात आला असून, अन्यथा इराणकडून हल्ला होऊ शकला असता.
स्फोटांचे आवाज तेहरानसह इतर भागांमध्ये ऐकू आले असून, परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याचे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यमांनी सांगितले आहे.















Discussion about this post