बारामती । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात झालेल्या निधनामुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर संबंधित कंपनी M/s VSR Ventures Pvt. Ltd. वर विविध स्तरांवरून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) नं कंपनीविरोधात मोठी प्रशासकीय कारवाई करत विशेष सुरक्षा लेखापरीक्षणानंतर कंपनीची 4 विमानं तत्काळ ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला आहे.
DGCA कडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कंपनीच्या सुरक्षा प्रक्रियेवर आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपास आणि कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) नं कंपनीचा सखोल ‘स्पेशल सेफ्टी ऑडिट’ केला. या बहुविभागीय तपासणीदरम्यान एअरवर्दिनेस, एअर सेफ्टी आणि फ्लाइट ऑपरेशन्स या क्षेत्रांमध्ये मंजूर प्रक्रियांतील अनेक त्रुटी तसेच नियमांचं उल्लंघन आढळून आलं. देखभाल प्रक्रियेमध्येही गंभीर उणिवा असल्याचं निदर्शनास आलं.
या पार्श्वभूमीवर कंपनीच्या Learjet 40/45 प्रकारातील VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या नोंदणी क्रमांकांच्या विमानांना पुढील आदेशापर्यंत उड्डाणास मज्जाव करण्यात आला आहे. एअरवर्दिनेसची आवश्यक मानकं पूर्ण होईपर्यंत ही विमानं ग्राउंडच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
आता DGCAच्या कारवाईमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून पुढील चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.















Discussion about this post