रत्नागिरी । राज्यात लाचखोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे. अशातच रत्नागिरीच्या सावर्डे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक मनीष कांबळे असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.
मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे झालेल्या अपघातानंतर संबंधित कुटुंबीयांना विमा प्रक्रियेसाठी कागदपत्रांची गरज होती. ही कागदपत्रे देण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यापैकी १५ हजार रुपये त्रयस्त व्यक्तीमार्फत स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्या पथकाने सापळा रचून कांबळे यांना पकडले.
या प्रकरणात अभिजीत शिर्के याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून सावर्डे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.















Discussion about this post