राज्य सरकारने लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे. पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही दिवसच बाकी असताना अद्याप लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते. त्यामुळे लाभार्थी महिला संभ्रमात होते. अखेर जानेवारी हत्याची प्रतिक्षा आज संपली. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळे दिलासा मिळालाय.
आदिती तटकरे यांची पोस्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.















Discussion about this post