जळगाव । मध्य रेल्वेने परिचालन कारणास्तव काही मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सोबतच काही गाड्यांचे टर्मिनल स्टेशन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल १३ व १४ एप्रिलपासून लागू होतील. यात अमरावती मुंबई – नागपूर दुरांतो आणि महानगरी मुंबई, एक्प्रेसचा समावेश आहे.
१२१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती एक्स्प्रेस शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री ८.५० वाजता सुटेल. पूर्वी ही गाडी रात्री ८.०५ वाजता सुटत होती. ही गाडी भुसावळ येथे पहाटे ३.२० ऐवजी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर दुरांतो ही गाडी रात्री ८.३५ वाजता सुटेल. ती आधी ७.५५ वाजता सुटत होती. १२२९० नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो ७.५० सुटेल. ती आधी ८.०५ वाजता सुटत होती. १७३८ दादर- हुबळी एक्स्प्रेस रात्री ८.१५ ऐवजी ८.०५ वाजता निघेल.
महानगरी एक्स्प्रेस आता पाच मिनिटे लवकर निघणार
२२१७७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी महानगरी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.१० वाजता सुटत होती. ती आता रात्री १२.०५ वाजता रवाना होईल. २२१७८ वाराणसी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महानगरी एक्स्प्रेस वाराणसी येथून सकाळी ९.४५ वाजता प्रस्थान करेल.















Discussion about this post