आधारमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. डिजिटल इंडियाअंतर्गत आधार सेवा चांगली बनवण्यासाठी सीएसई-ई गव्हर्नंस सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडने आधार सुपरवायजर आणि ऑपरेटर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
ज्या तरुणांना आपल्याच राज्यात राहून काम करायचे आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही csc.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आधारमध्ये सीएससी ई गव्हर्नंस सर्व्हिसेस, इंडिया लिमिटेड आधार सेवा केंद्रात भरती केली जाणार आहे. २५२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२६ आहे. या नोकरीसाठी १ वर्षांसाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास केलेले असावे. याचसोबत २ वर्षांचा आयटीआय केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. १०वीनंतर ३ वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला csc.gov.in वर जायचे आहे.
यानंतर तिथे तुम्हाला ASK Job Opening वर जायचे आहे.
यानंतर आधार सुपरवायजर पदावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. यानंतर नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड ही सर्व माहिती द्यायची आहे.
यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.















Discussion about this post