मुंबई । विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर वादात सापडणार का अशी चर्चा रंगली आहे. त्याचे कारण ठरलंय, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेला अलिबागमधील एक व्हिडिओ.संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्याशी संबंधित शेअर केलेल्या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये जमीन मोजणीसाठी गेल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना हाकलून लावण्यात आल्याचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केलाय. राऊत यांनी ट्विट करत म्हटलंय की, विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!
ब्रेकिंग:
विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?
राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!
तुम्ही सांगताय की मी सांगू?
@Dev_Fadnavis
@rahulnarwekar
@PMOIndia pic.twitter.com/r5YqC9j2Xi— Sanjay Raut (@rautsanjay61) February 14, 2026
तुम्ही सांगताय की मी सांगू? असे प्रश्न त्यांनी नार्वेकरांना विचारलेत. संजय राऊत यांनी व्हिडिओ पोस्ट करताना आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि पीएमओला सुद्धा टॅग केले आहे. नार्वेकर यांच्यासह जमीन मोजणीसाठी गेलेल्या सहकाऱ्यांसोबत एक दाम्पत्य भांडण करत होतं. महिलेची नार्वेकरांच्या सहकाऱ्यांसमवेत झटापट सुरु असतानाच मागून व्हिडिओ कर असा आवाज येताच राहुल नार्वेकर मान खाली घालून जातांना दिसत आहे.















Discussion about this post